Breaking

Friday, November 19, 2021

खोतकरांचा १०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप, ते २३ मंत्री-नेते कोण? https://ift.tt/3DBYXxN

औरंगाबाद: ‘ नेते, माजी मंत्री यांनी जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने, फसवणूक करून खरेदी करीत शंभर कोटींचा घोटाळा केला आहे,’ असा आरोप करत भाजप नेते यांनी खळबळ उडवून दिली आहे. साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयांची जमीनही बळकविण्याचा खोतकर यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ( ) वाचा: सोमय्या म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे सक्तवसुली संचालनालय ( ), प्राप्तिकर विभाग, राज्य व केंद्राच्या सहकार विभागाकडे दिले असून, या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. जालना सहकारी साखर कारखाना १९८६-८७मध्ये सुरू झाला. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे १३५ एकर जमीन नाममात्र दराने कारखान्यास दिली. प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपयांचा एक शेअर देण्यात आला होता. असे एकूण नऊ हजार भागधारक होते. पुढे एमएससी बँकेची थकबाकी २००७अखेर ११.४२ कोटी एवढी झाल्याने हा कारखाना लिलावात काढण्यास भाग पाडण्यात आले.’ वाचा: ‘फेब्रुवारी २०१२मध्ये टेंडर काढण्यात आले. नुसत्या जमिनीची रेडी रेकरन व्हॅल्यू ७० कोटी रुपये असताना व्हॅल्युअरला मॅनेज करून, संपूर्ण कारखान्याची लँड अँड प्लांट, तसेच मशिनरी रिझर्व्ह प्राइस फक्त ४२ कोटी ठेवण्यात आली. खोतकर यांनी २०१२पासून हा साखर कारखाना खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते,’ असा आरोपही सोमय्या यांनी केला. कारखाना खरेदी व्यवहारात खोतकर यांच्याशी संबंधित औरंगाबादेतील दोन व्यावसायिकांच्या कंपन्यांचा आधार घेण्यात आला, असेही सोमय्या म्हणाले. औरंगाबादेत ‘ईडी’ने याच संबंधाने दोन व्यावसायिकांच्या कार्यालयाची तपासणी केल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. कारखाना विक्री प्रकरणी काही शेतकरी आणि व्यक्तींना भेटण्यासाठी औरंगाबादेत आल्याचेही सोमय्या म्हणाले. या प्रकरणी काही दिवसांतच कडक कारवाई होईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला भाजपचे शहाराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, राजू शिंदे उपस्थित होते. ठाकरे सरकारमधील २३ मंत्र्यांची चौकशी ‘महाराष्ट्राला लुटण्याचे कारस्थान ठाकरे-पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून करण्यात येत आहे. सरकारचा गृहमंत्री वसुली प्रकरणामुळे जेलमध्ये जातो. त्यामुळे नेत्यांची मान शरमेने खाली जाण्याऐवजी ते धमकी देत आहेत,’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. सरकारमधील २३ मंत्री, नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचेही सोमय्या म्हणाले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Cwe8at

No comments:

Post a Comment