Breaking

Friday, November 12, 2021

मणिपूर निवडणुकीत कोण बाजी मारणार? भाजप की काँग्रेस? सर्वे म्हणतो... https://ift.tt/3DbuZRh

नवी दिल्लीः देशात पुढच्या वर्षी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व राज्यांमध्ये ABP C-Voter 2022 Election Survey करण्यात आला. यातील पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येण्याचा अंदाज सर्वेतून वर्तवण्यात आला आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. सर्वेत नागरिकांनी भाजपला ३९ टक्के, काँग्रेसची ३३ टक्के, NPF ला ९ टक्के आणि इतरांची १९ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार भाजपला ६० जागांपैकी २५-२९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २०-२४, एनपीएफला ४-८ आणि इतरांना ३-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भाजप इतरांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकते. उत्तराखंड, गोवा, यूपी आणि पंजाबमध्ये एबीपी न्यूजने सी-व्होटरसह सर्वे केला आहे. उत्तराखंड, गोवा आणि यूपीमध्ये भाजपचे पुनरागमन होत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. त्याचवेळी सर्वेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती दिली आहे. गोव्यातही भाजपचे पुन्हा सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती नागरिकांनी दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CatBwR

No comments:

Post a Comment