कोल्हापूर: जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावरील व्हनाळी या गावानजीक चार चाकी गाडीचा स्फोट () होऊन एकाचा होरपळून मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. वाघजाई घाटात चालत्या कारचा हा स्फोट झाला असून कार घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पेटत गेलेली कार दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली. वाचा: पोलिसांनी जळालेल्या कारचा शोध घेतला असता कार नंबर एम. एच. ०९ एक्यू ३७०३ असून अभिजित धनवडे (राहणार कणेरी) यांच्या मालकीची असल्याचे समजले. कारमधील व्यक्तीचा मृतदेह पूर्ण जळालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. कार चालकाची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30kOetj
No comments:
Post a Comment