Breaking

Thursday, November 11, 2021

मुख्यमंत्रिपदाबाबतची 'ती' पोस्ट व्हायरल; एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा https://ift.tt/3DeXpda

मुंबई: नगरविकास मंत्री यांच्याकडे सोपविण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे सोशल मीडियात फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसे ट्वीटच शिंदे यांनी केले आहे. ( ) वाचा: मानेच्या दुखण्याने त्रस्त आहेत. त्यावरील उपचारासाठी ते एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. यांना रुग्णालयातील १९ व्या मजल्यावरील विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्र्यांवर कोणतीही वैद्यकीय चाचणी केली जाणार नाही. उद्या सकाळी वरिष्ठ ऑर्थो सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर छोटी शस्त्रक्रिया होईल, असे सांगण्यात येत आहे. पुढील साधारण दोन ते तीन दिवस मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. त्यात मानेच्या दुखण्याबाबत माहिती देतानाच त्यांनी मोहिमेबाबत साद घातली होती. करोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असे आवाहन या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी केले होते. वाचा: दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतानाच सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टवर एकनाथ शिंदे यांनी तातडीने खुलासा केला आहे. शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून खुलासा करत हा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. जी पोस्ट व्हायरल होत आहे त्यात कोणतेही तथ्य नाही. ही पोस्ट अथवा अशा आशयाच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे शिंदे यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद व तमाम जनतेच्या सदिच्छा मुख्यमंत्र्यांसोबत आहेत, असेही शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3C6VohE

No comments:

Post a Comment