चिपळूण: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील () गेल्या ५ तासापासून ठप्प झाला आहे. कुंभार्ली घाटातील एका अवघड वळणावर ट्रक बंद पडल्याने अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छोट्या कार मात्र सुरू आहेत. संबंधित क्रेनचे पैसे मालकाकडून भरून घेऊन नंतरच घटनास्थळी क्रेन येणार असल्याने हा वेळ गेल्याचे वृत्त आहे. रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे गेल्या पाच ते सहा तासापासून ही वाहतूक पूर्णत ठप्प असल्याने घाटात रस्त्याच्या दोन्ही साईडला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे वाहन चालक यांमधून नाराजीने संताप तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. गेले अनेक दिवस या घाटात असलेले खड्डे बुजवावीत अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थ करत होते मात्र प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही स्थिती उद्भवली आहे. आणखी वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nXgbAm
No comments:
Post a Comment