Breaking

Saturday, November 20, 2021

फसवणुकीचा गुन्हा का नको?; एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल https://ift.tt/3FQcW43

म. टा. प्रतिनिधी, निवडणूकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात, 'एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करणार आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन आणि भत्ते लागू करणार, असे अधिकृतपणे म्हटले होते. आज राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार असताना हे वचन पूर्ण होणार नसेल तर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा का दाखल करू नये ? असा संतप्त सवाल आझाद मैदानातील संतप्त कामगारांनी उपस्थित केला आहे. फेसबूकच्या माध्यमाने 'चलो मुंबई'ची हाक दिल्यानंतर राज्यातील हजारो कर्मचारी शनिवारी सकाळीच मैदानात आले. यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांनी महामंडळाने दिलेल्या पगाराची 'पेमेंट स्लीप' जवळ बाळगली होती. एसटी महामंडळात ११ वर्षे सेवा पूर्ण करणारे कर्मचारी मोहन नागमोडे यांनी सांगितले की, ११ वर्षे सेवा केल्यानंतर मुळ पगार १५,०८५ इतका आहे. एसटी महामंडळाची वजाती रक्कम वजा होऊन हातात १३ हजार पगार येतो. माझ्यावर कोणतेही कर्ज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महागाई भत्ता नावापूरता होता. दिवाळीत आंदोलन होण्याची कुणकुण लागताच वाढीव महागाई भत्त्यांची घोषण केली. हे आर्थिक शोषण नाही तर काय आहे ? बाळासाहेब असताना त्यांनी सांगितले होते, शिवशाहीचे सरकार आल्यानंतर कामगारांचे मोर्चे निघणार नाहीत, निघालेच तर संबंधित खात्याचे मंत्री मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली येतील आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतील मात्र; अजूनपर्यंत परिवहन मंत्री अनिल परब एकदा ही आझाद मैदानात आले नाही, यामुळे आम्हांला लेकरांबाळासंह आझाद मैदानात यावे लागले, असे लिपीक रुक्मिणी साबळे यांनी सांगितले. राज्यातील बहुतांशी आगारातील प्रत्येकी १०० ते १५० कर्मचारी मुंबईत आले. मैदानात कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली. गर्दी बेभान होऊ नये आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी गर्दीला मैदानाबाहेर जाण्यास मज्जाव करत येथेच आंदोलन करण्याच्या सूचना केल्या. पोलिसांच्या सूचनांचे पालन करत कर्मचाऱ्यांनी मैदानातच घोषणाबाजी करत आंदोलन केले. वरिष्ठांचे आदेश राज्यातील २५० आगारातून कर्मचारी मुंबईत येणार असल्याने मुंबईच्या प्रवेशद्वारावर अर्थात टोलनाक्यांवर शनिवारी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. 'गाड्यांनी भरून येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना येथेच थांबवावे त्यांना मुंबईत प्रवेश देऊ नये', असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DFiKwf

No comments:

Post a Comment