Breaking

Saturday, November 20, 2021

मुंबईत गेल्या दहा वर्षांत ३९ हजार झाडांची कत्तल; खासगी बिल्डरांसाठी सर्वाधिक वृक्षतोड https://ift.tt/30GEppW

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईत गेल्या दहा वर्षांत ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. कापलेल्या झाडांइतकेच ३६ हजार ११७ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. सर्वाधिक म्हणजे २१ हजार झाडांची कत्तल ही खासगी बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिली आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे मुंबईत सरकारी आणि खासगी प्रकल्पांसाठी दरवर्षी हजारो कापण्याची परवानगी दिली जाते. तसेच झाडे वाचविण्यासाठी पुनर्रोपणाची परवानगी दिली जाते. पुनर्रोपण केलेली झाडे जगण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे सांगितले जाते. किती झाडे जगली, याची माहिती पालिका जाहीर करत नसल्याने झाडांच्या कत्तलीचे गूढ कायम असते. पुनर्रोपित केलेल्या झाडांची नियमीत तपासणी करण्यासाठी पालिकेची यंत्रणा नसल्याचा आरोप नगरसेवक करतात. वृक्ष प्राधिकरणाच्या नियमानुसार कापलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात तीन नवी झाडे लावण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचे किती पालन होते, ही झाडे कुठे लावली जातात, असा सवाल केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अमित साटम यांनी फेब्रुवारी २०१० ते जुलै २०२१ या कालावधीत मुंबईत किती झाडे कापण्यात आली, किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाकडे मागितली होती. विभागाने सात परिमंडळांच्या हद्दीतील कापलेल्या व पुनर्रोपण केलेल्या झाडांची माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ तीनमध्ये सर्वाधिक ६,४०२ झाडे बिल्डरांकडून कापण्यात आली असून, तीन हजार ३३३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. त्याखालोखाल परिमंडळ चारमध्ये चार हजार ८२६ झाडे कापली, तर तीन हजार १२३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार साटम यांनी याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. मेट्रो कारशेडसाठी २,७०० झाडे कापण्यात आली. त्याबदल्यात तीनपट झाडे लावण्यात येणार होती त्याचे काय झाले, असा सवाल केला आहे. ३९ हजार झाडांच्या कत्तलीची परवानगी देण्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही साटम यांनी या पत्रात केली आहे. खासगी बिल्डर झाडे कापली २१,२५३ पुनर्रोपण १७,९६४ .... महापालिका झाडे कापली ८,८४३ पुनर्रोपण १०,०७५ .... एमएमआरडीए झाडे कापली ८,८०३ पुनर्रोपण ८,०७८ .... एकूण लेखाजोखा झाडांची कत्तल ३८,९९९ झाडांचे पुनर्रोपण ३६,११७


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kY1ACK

No comments:

Post a Comment