Breaking

Monday, November 29, 2021

दोन दिवसांत सोयाबीनचे भाव ६०० रूपयांनी उतरले, शेतकऱ्यांची घालमेल https://ift.tt/3FX0mjl

हिंगोली : या आठवड्यात सोयाबीन व कापसाच्या दरातील चढ उताराणे शेतकऱ्यांची चागलीच घालमेल होत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पहाता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु, मागील आठवड्यात दरांमध्ये चांगलीच वाढ होत, हिंगोली शुक्रवार दि.२६ रोजी उच्च दर्जाची सोयाबिन ७ हजार १०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला. परंतु रविवारी सोमवार दि.२९ रोजी याच सोयाबीनला ६४०० ते ६२०० रुपये दर मिळाला, प्रति क्विंटल मागे दोन दिवसात ८०० ते ६०० रुपयांनी दर घसरले. शेतीमालाच्या दरात सतत चढ उतार पाहून शेतकऱ्यांच्या मनाची घालमेल सुरू आहे. गेल्या हंगामात सोयाबीन प्रतिक्विंटल ११ हजार रुपयेच्या पुढे गेल्याने यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पहिली पसंती दिली. त्यामुळे कापसाला मागे सारून सोयाबीन नंबर एकचे पीक ठरले. सुरवातीला पाऊस वेळेवर पडल्याने सोयाबीन जोमात आले परंतु फुले लागत असताना पावसाने ओढ दिली, तसेच शेंगा लागल्यानंतर अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका बसून उत्पादन घटले. दर चांगला असल्याने हे नुकसान भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात करताच केंद्र शासनाने तेल आयातीवरील कर घटवले, सोया पेंड आयात केली. याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर कोसळायला सुरुवात झाली. ११ हजारांवर असलेले दर ४ हजार ८०० ते ५ हजारांवर आले. अतिवृष्टीमुळे आणि कोसळणारे दर पहाता शेतकरी चिंतेत होता. दर वाढतील या आशेवर ७० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करुन माल घरातच साठवून ठेवले आहे. हा अंदाज खरा ठरत असून मागील सात-आठ दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत असून शुक्रवारी दि.२६ हिंगोली, सेनगाव मध्ये प्रतिक्विंटल ७ हजार १०० असा दर मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचां पेरा आहे. पांढर सोनं म्हणून ओळखले जाणारे कापसाचे यंदा उत्पादन घटले आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सुरवातीपासूनच यावर्षी कापसाला साडेसात हजार प्रतिक्विंटल दर मिळाला. वाढत तो ८८०० वर पोचला होता. दिवाळीनतर कापसाचे दर घसरत ८१०० पर्यंत खाली आले. मागील आठवड्यापासून कापसाचे दरात चढ उतार होत आहे. वाढते दर पाहून शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. परंतु दोन दिवसात सोयाबीन, कापसाचे दर घसरण्यास सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चागलीच घालमेल होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3d43LjO

No comments:

Post a Comment