Breaking

Saturday, November 20, 2021

नवाब मलिकांच्या कन्येच्या नव्या दाव्याने खळबळ; वानखेडेंचा विवाह दाखला केला ट्विट https://ift.tt/3Fytttc

मुंबई: अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी एनसीबीचे प्रादेशिक संचालक यांच्याबाबत खुलाशांवर खुलासे करत खळबळ उडवून दिल्यानंतर आता मलिक यांच्या कन्या यांनी एक नवे ट्विट समीर वानखेडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. सना यांनी आज समीर वानखेडे यांचे विवाहाचा कथित दाखला ट्विट केला आहे. (nawab maliks daughter sana malik tweets sameer wankhedes alleged marriage certificate) या विवाहाबाबतचे अर्धसत्य लोकांना माहीत होतं, आता मी पूर्ण सत्य सांगत आहे, असं सांगत सना यांनी समीर वानखेडे यांच्या विवाहाचा कथित दाखला ट्विट केला आहे. या कथित दाखला म्हणजे समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या विवाह झाल्याचा दाखला असल्याचे सना यांनी दाखवून दिले आहे. या दाखल्यावर समीर वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिलेले आढळते. तसेच हा दाखला २६ डिसेंबर २००६ रोजी जारी करण्यात आल्याचे यावर दिसत आहे. या पूर्वी समीर वानखेडे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या निमंत्रण पत्रिकेवर देखील समीर दाऊद वानखेडे असे नमूद केलेले दिसत होते. आता सना यांनी त्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेनंतर लग्नाचा दाखला आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. एनसीबीने आर्यन खान यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य दिसत नसल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. त्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले आहे 'आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेले आहे. याचाच अर्थ की हा फर्जीवाडा होता हे आता स्पष्ट झालं आहे,' असे मलिक यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- मलिक यांच्या या हल्ल्यानंतर आता त्यांची मुलगी सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या ट्विट करत वानखेडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oJHVYl

No comments:

Post a Comment