लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातल्या श्रद्धाळुंच्या धार्मिक भावनेला थेट हात घातलाय. '' या कार्यक्रमात 'देशाचा वारसा देशाला परत करण्याचं' नागरिकांना दिलेलं वचन पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलंय. यानुसार, कॅनडामध्ये सापडलेली भारतात दाखल झालीय. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी आपल्या 'मन की बात' दरम्यान बोलताना, कॅनडामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती सापडल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाच्या लोकांना दिली होती. 'भारतासाठी हा एक अभिमानाचा क्षण' असल्याचं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं होतं. तसंच ही मूर्ती भारतात आणणार असल्याचं वचन त्यांनी देशातील लोकांना दिलं होतं. वर्षभरात ही मूर्ती भारतात दाखल झालीय. खुद्द यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आलीय. वाराणसीत १५ नोव्हेंबर रोजी एकादशीच्या निमित्तानं श्रीकाशी विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणात राणी भवानी उत्तर गेटच्या बाजुलाच 'आस्थेचं प्रतिक' बनलेल्या या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती कॅनडाच्या 'मॅकेन्जी आर्ट गॅलरी, युनिव्हर्सिटी ऑफ रेजिना'मध्ये ठेवण्यात आली होती. २०१९ मध्ये विनिपेगमध्ये राहणाऱ्या मूळ भारतीय कलाकार दिव्या मेहरा आर्ट गॅलरीत प्रदर्शनीसाठी उपस्थित झाल्या होत्या. इथे त्यांना ही मूर्ती नजरेस पडली. अभ्यासानंतर ही मूर्ती १९१३ मध्ये वाराणसीच्या गंगेच्या किनाऱ्यावरून चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दिव्या यांच्या प्रयत्नांमुळे तसंच सरकारच्या आणि भारतीय दूतावासाच्या मदतीनं ही मूर्ती भारताकडे सोपवण्यात आलीय. बलुआ दगडात कोरलेली ही मूर्ती १८ व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातंय. मूर्तीच्या एका हातात वाटी आहे तर दुसऱ्या हातात चमचा आहे. काशीच्या लोकांना कधीही उपाशी न झोपू देणारी आणि धन-धान्याची प्रतिमा असलेली अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती अनेक भाविकांसाठी भावनिक विषय आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3c4QGX9
No comments:
Post a Comment