Breaking

Friday, November 12, 2021

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात, अनेक शहरांत तणाव; गृहमंत्र्यांचं मोठं पाऊल https://ift.tt/3n8EsD1

मुंबई: राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ( ) वाचा: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळावी आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थिती आता नियंत्रणात करण्यासाठी राज्यातील अनेक शहरांत शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चाला , , अमरावती आणि आणखी काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यात काही भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या. तेथील स्थिती आता नियंत्रणात असून मी यावर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थितीबाबत अपडेट्स मी घेत आहे. या स्थितीत धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. वाचा: दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे. 'त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी', असे आवाहन त्यांनी केले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Dgr9pR

No comments:

Post a Comment