Breaking

Friday, November 12, 2021

किरण गोसावीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; नवं प्रकरण आलं समोर https://ift.tt/3HdX8tc

पिंपरी: सध्या राज्यभरासह देशात चर्चेत असलेल्या क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील ‘एनसीबी’चा साक्षीदार असलेल्या (वय ३६, रा. ) याच्या विरोधात ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने त्याने सव्वादोन लाखांची फसवणूक केली आहे. (वय ३३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी या प्रकरणी गुरुवारी (११ नोव्हेंबर) सायंकाळी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( ) वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये कानडे नोकरी शोधत होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज केले होते. त्याच दरम्यान वेगवेगळ्या ‘जॉब पोर्टल’वरून त्यांना नोकरीसाठी ऑफर येत होत्या. २१ मार्च २०१५ रोजी कानडे यांना मेल आला. त्यात परदेशात हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी असल्याचे नमूद केले होते. त्यासाठी कानडे यांचा बायोडेटा मागवण्यात आला. कानडे यांनी त्यांचा बायोडेटा मेलद्वारे पाठवला. आरोपी किरण गोसावीने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे आमिष दाखवून नाशिक फाटा, कासारवाडी येथे भेटून ३० हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर शिवा इंटरनॅशनल, माजीवाडा, ठाणे येथील कार्यालयात जाऊन पाच एप्रिल २०१५ रोजी किरण गोसावीकडे कानडे यांनी ४० हजार रुपये दिले. वाचा: किरण गोसावीच्या सांगण्यावरून एका बँक खात्यावर कानडे यांनी २० हजार रुपये पाठवले. वैद्यकीय तपासणीसाठी गोसावीच्या ठाणे येथील कार्यालयात जाऊन कानडे यांनी १० हजार रुपये भरले. वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी एकूण दोन लाख २५ हजार रुपये कानडे यांनी आरोपी गोसावीला दिले. पैसे घेऊन गोसावीने कानडेंची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोच हा किरण गोसावी का? क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील ‘एनसीबी’चा साक्षीदार किरण गोसावी याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांची आणि कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीची पद्धत काहीशी समान आहे; परंतु या प्रकरणात आरोपी तोच किरण गोसावी आहे, याची खात्री अद्याप झालेली नाही. कानडे यांनी किरण गोसावी नावाच्या व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. कानडे यांच्याशी चर्चा सुरू असून, त्यातून आरोपीची ओळख पटवून तोच आरोपी असल्यास त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी सांगितले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3orSFua

No comments:

Post a Comment