Breaking

Friday, November 12, 2021

पकडले जाऊ नये म्हणून पोलिसच पैसे घेऊन पळाला आणि नोटा बदलून... https://ift.tt/3n8wEkF

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई गुन्ह्यातील सोने हस्तगत न करण्यासाठी व्यापाऱ्याकडून ३५ हजाराची लाच घेऊन पोलिसांनी पळ काढल्याची घटना शुक्रवारी कांदिवली पोलिस ठाण्यात घडली. लाचेची रक्कम नष्ट करून पाहणाऱ्या दोन्ही अखेर ॲन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले. (two bribe takers were caught by the anti corruption bureau) कांदिवलीमध्ये सोने चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका कारागीराला अटक केली. त्याने चोरलेले सोने याच विभागातील सोने व्यापाऱ्याला विकल्याचे सांगितले. या सोन्याची जप्ती दाखवू नये अशी विनंती या व्यापाऱ्याने केली. असे करण्यासाठी सहायक निरिक्षक अविनाश पवार आणि कान्स्टेबल रविंद्र भोसले यांनी ७५ हजार रूपयांची मागणी केली. व्यापाऱ्याने यापैकी ४० हजार रुपये पोलिसांना दिले. उर्वरित ३५ हजार रुपयांसाठी पोलिसांनी तगादा लावला. दुकानात येऊन पोलिस पैसे मागू लागले. वारंवारच्या तगाद्याला कंटाळून व्यापाऱ्याने ॲन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. क्लिक करा आणि वाचा- व्यापाऱ्याने ३५ हजार रूपये कांदिवली पोलिस ठाण्यात घेऊन येतो असे सांगितले. त्यानुसार ॲन्टी करप्शन ब्युरोने पोलिस ठाण्यात सापळा रचला. व्यापाऱ्याकडून रविंद्र भोसले याने ३५ हजार रुपये घेतले. मात्र भोसले आणि अविनाश पवार दोघांनाही सापळा लागला असल्याची कुणकुण लागली. लाच म्हणून घेतलेली रक्कम घेऊन भोसले दुचाकीवरून घेऊन पळाला आणि नोटा बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. क्लिक करा आणि वाचा- ॲन्टी करप्शन ब्युरोने दोघांनाही ताब्यात घेतले असून लाच आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3F9tmnB

No comments:

Post a Comment