म. टा. विशेष प्रतिनिधी, : करोनासंसर्गाचा फटका आरोग्यव्यवस्थेमधील विविध यंत्रणांना बसला असतानाच, वाया जाण्याचे प्रमाणही या कालावधीत अधिक असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वांत जास्त रक्त वाया गेले असून, महाराष्ट्राचा यात अग्रस्थानी आहे. करोनासंसर्गामुळे देशात २०२०मध्ये तीन लाख ४३ हजार ७८३ युनिट रक्त वाया गेले असून, राज्यात हे रक्त वाया जाण्याचे प्रमाण १५ टक्के म्हणजे ५२ हजार ३६४ युनिट होते. रक्त वाया जाण्यात पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो. येथे ४५ हजार ८७२ युनिट रक्त वाया गेले असून, तामिळनाडू तिसऱ्या क्रमाकांवर आहे. येथे ४४ हजार ५५७ युनिट रक्त वाया गेले. या तिन्ही राज्यांमध्ये रक्त वाया जाण्याचे प्रमाण ४१.५ टक्के असल्याचे उपलब्ध माहितीच्या वैद्यकीय विश्लेषणातून स्पष्ट होते. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नातंर्गत ही माहिती केंद्र सरकारच्या डीजीएचएस विभागाने दिली आहे. रक्त मुदतबाह्य होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांचा असतो. मात्र या कालावधीमध्ये रक्त वापरले गेले नाही तर त्यामध्ये काही घटकांचा समावेश करून हा कालावधी ४२ दिवसांपर्यंत नेता येतो. देशामध्ये करोनासंसर्गामुळे लॉकडाउन लागेल याची रक्तपेढ्यांना पूर्वकल्पना नव्हती. जानेवारी ते मार्च या कालावधीत जे रक्त संकलित करण्यात आले होते, ते एप्रिल व मे महिन्यापर्यंत वाया गेले. २०२० मध्ये एक लाख ५५ हजार ३३२ युनिट रक्त हे सिरो रिअॅक्टिव्ह असल्यामुळे वापरता आले नाही. या प्रकारामध्ये एचआयव्ही, कावीळ बी, सी, मलेरिया यांचा संसर्ग रक्तामध्ये असतो. कोणत्याही स्वरूपाच्या रक्तसंकलनामध्ये हा संसर्ग असल्याचे दिसून येतो. तो टाळता येत नाही. मात्र रक्तसंकलनाच्या वेळी दात्याकडून योग्य माहिती घेऊन हे संकलन न केल्यास या गटातील रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी होते, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ एन.आर. मोहीत लक्ष वेधतात. सिरो रिअॅक्टिव्ह कारणांमुळे संसर्गित रक्त वाया जाण्यामध्ये उत्तर प्रदेशचा क्रमांक पहिला आहे. येथे २१ हजार ९३६ युनिट रक्त वाया गेले. पश्चिम बंगालमध्ये १६ हजार ३५१, तर तिसऱ्या क्रमाकांवरीन महाराष्ट्रात १३ हजार ८५ रक्ताचे युनिट वाया गेल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते. देशात २०२०मध्ये एक लाख ६५ हजार ६५२ युनिट रक्त अन्य कारणांमुळे वाया गेले. त्यात पश्चिम बंगालमध्ये २१ हजार ६६१, गुजरातमध्ये २१ हजार ६०४, तामिळनाडूमध्ये १८ हजार ४८० युनिट रक्त वापरता आले नाही. या कारणांमुळे रक्त वाया जाण्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमाकांवर असून, राज्यात १५ हजार ६५३ युनिट रक्त वाया गेल्याचे स्पष्ट होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kSrWWX
No comments:
Post a Comment