Breaking

Friday, November 19, 2021

डॉक्टरलाच १३ लाखांचा डोस; भेटवस्तूच्या नावाखाली घातला गंडा https://ift.tt/3oOu572

म. टा. खास प्रतिनिधी, कांदिवलीतील आयुर्वेदिक डॉक्टरला इटली येथील स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या त्याच्या मित्राने १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रादेशिक विभाग सायबर पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली असून यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. विनायक (बदललेले नाव) हे लॉकडाउन सुरू झाल्यापासून ऑनलाइन माध्यमातून वैद्यकीय सल्ला देतात. याबाबत त्यांनी समाजमाध्यमांवर जाहिरातदेखील केली आहे. ही जाहिरात पाहून फेसबुकवर त्यांना मार्को केल्विन या नावाने रिक्वेस्ट आली. प्रोफाइलवर डॉक्टर असे लिहिण्यात आल्यामुळे विनायक यांनी ही रिक्वेस्ट स्वीकारली. आयुर्वेदाबाबत जाणून घेण्यास इच्छुक असल्याचे सांगत मार्को याने विनायक यांचा मोबाइल क्रमांक घेतला. आपण इटलीहून बोलत असल्याचे सांगून मार्को हा विनायक यांच्याशी नियमित गप्पा तसेच चॅटिंग करू लागला. आपल्याकडून चांगली माहिती मिळत असल्याचे सांगत मार्को याने विनायक यांच्याशी मैत्री केली. तुमचा स्वभाव आवडला असे सांगून एक गिफ्ट पाठविले असल्याचे मार्को याने सांगितले. ८५ हजार युरो, घड्याळ आणि हँडबॅग अशा गिफ्टचे हे पार्सल असल्याचे माहिती त्याने दिली. काही दिवसांनी दिल्ली कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगत विनायक यांना फोन आला. तुमचे गिफ्ट महागडे असल्याने कस्टम ड्युटी, पेनल्टी, इन्शुरन्स फी अशी वेगवेगळी कारणे सांगून विनायक यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. यावर त्यांनी मार्को यांच्याकडे विचारपूस केली असता, थोडे पैसे खर्च केल्यास तुम्हाला जास्त रक्कम मिळेल, असे त्याने सांगितले. त्यामुळे विनायक याने तब्बल १३ लाख ५९ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. दिल्लीसह अन्य भागांतून आरोपी चतुर्भुज एवढे करूनही गिफ्ट न मिळाल्याने आणि नंतर मार्को याचा संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे विनायक यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दिल्ली तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागातून पाच आरोपींना अटक केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kPgqvm

No comments:

Post a Comment