मुंबई: कोविडच्या नव्या विषाणूची घातकता लक्षात घेत मुख्यमंत्री यांनी आज राज्यातील सर्व प्रमुख अधिकारी, टास्क फोर्स सदस्य, आरोग्य यंत्रणांचे प्रमुख यांची बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत कोविडच्या या नव्या विषाणूबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती टास्क फोर्सकडून देण्यात आली व सावध करण्यात आले. ( ) वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोविडच्या नव्या पाहता त्यांनी तिथूनच आज तातडीची बैठक घेतली व या विषाणूचा शिरकाव महाराष्ट्रात होऊ नये म्हणून महत्त्वाच्या सूचना केल्या. ओमिक्रॉनची घातकता लक्षात घेता या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बैठकीच्या प्रारंभीच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हे कारण असल्याचे सांगितले. आरोग्य विभगाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक व डॉ. राहुल पंडित यांनी यासंदर्भात काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य यांनी या विषाणूविषयी जी माहिती दिली ती पाहता या विषाणूबाबत अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. वाचा: डॉ. जोशी ओमिक्रॉनबाबत म्हणाले... - कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. - डेल्टाची जागा ओमिक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते. - दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण आहेत. - हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. वाचा: टास्क फोर्सने केल्या या सूचना? - डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल ३ प्लाय मास्क आणि एन ९५ प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल - खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेव्हा अधिक खबरदारी बाळगावी लागेल. - अनावश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा. - ज्यांनी वरील लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी. - दुहेरी मास्कचा वापर, मोकळ्या हवेत वावर, आणि लसींचे दोन्ही डोस हाच ओमिक्रॉनला रोखण्याचा एकमेव मार्ग. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lboNBJ
No comments:
Post a Comment