Breaking

Thursday, November 25, 2021

ट्रॅक्टर चालवत असताना घडली दुर्घटना; चालकाचा जागीच मृत्यू! https://ift.tt/3rdV4vF

: हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथे रेल्वे रुळाजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामकिसन भगाजी वामन (वय ५० वर्ष) असं मृत चालकाचं नाव आहे. () रामकिसन वामन हे ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होते. मात्र गुरुवारी सायंकाळी अकोला-पूर्णा रेल्वे रुळाचे रूंदीकरणाचे काम सुरू असताना रामकिसन यांचा ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टर मागे घेताना थेट खदानीमध्ये उतरल्यामुळे सदरील घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. रामकिसन हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंड असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे माळहिवरा गावावर शोककळा पसरली आहे. अद्याप तरी याप्रकरणी कुठल्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Zm5YUA

No comments:

Post a Comment