Breaking

Monday, November 29, 2021

लाचप्रकरणी दोन पोलिस उप निरीक्षक ताब्यात; खासगी व्यक्तीचा शोध सुरू https://ift.tt/3rgurq1

म. टा. प्रतिनिधी, ठाणे पन्नास हजाराची लाच स्विकारल्यानंतर पोलिस उप निरीक्षकाने लाचेची रक्कम खासगी व्यक्तीकडे देऊन या दोघांनीही पळ काढला. परंतु, नंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने () या पोलिस उप निरीक्षकाला ठाण्यातून तर याच लाचप्रकरणात लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहित करणाऱ्या आणखी एका पोलिस उप निरीक्षकाला घरातून ताब्यात घेतले असून या प्रकरणी मिरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खासगी व्यक्तीचा एसीबीकडून शोध घेण्यात येत आहे. (two police sub-inspectors arrested in bribery case action taken by thane ) क्लिक करा आणि वाचा- तक्रारदार यांच्याविरुद्ध एकाने मिरारोड पोलिस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार केली असून या तक्रारीची चौकशी पोलिस उप निरीक्षक गोविंद एकीलवाले करीत होते. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यात त्यांना अटक करू नये यासाठी एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे १० लाखांची लाच मागितली. तसेच ही रक्कम देण्यासाठी याच पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक प्रकाश कांबळे प्रोत्साहित करत असल्याबाबत तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी ठाणे एसीबीकडे तक्रार केली. क्लिक करा आणि वाचा- या तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता, पोलिस उप निरीक्षक एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे लाचेची निश्चित रक्कम न सांगता संदिग्धपणे लाचेची मागणी केली होती. एसीबीने पुन्हा २६ नोव्हेंबरला केलेल्या पडताळणीमध्ये एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे २ लाख ५० हजारांची लाच मागितल्याचे तसेच पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांनी लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहित केले. तसेच लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानुसार सोमवारी एसीबीने मिरारोड पोलिस ठाण्यात सापळा लावला. परंतु एकीलवाले हे तक्रारदारास खासगी वाहनाने पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घेऊन गेले. आणि तक्रारदाराकडून ५० हजाराची लाच स्विकारल्यानंतर एकीलवाले यांनी ही रक्कम खासगी व्यक्ती सुकेश कोटीयन उर्फ अण्णा याच्याकडे दिली. त्यानंतर एकीलवाले आणि सुकेश दोघेही पळून गेले. क्लिक करा आणि वाचा- परंतु एकीलवाले यांना एसीबीने ठाण्यातील कोर्टनाका परिसरातून तर कांबळे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तर सुकेश याचा शोध सुरु असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. या प्रकरणी मिरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3I3LRft

No comments:

Post a Comment