Breaking

Sunday, November 21, 2021

एसटी संप मोडीत काढण्यासाठी मोठी पावले!; धुळे, जळगावात तणाव https://ift.tt/3xaI4ru

जळगाव: राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. कर्मचारी मागे हटत नसल्‍याने बससेवा पूर्ववत करण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी एसटीचे स्‍टेअरिंग हातात घेत गाडी सुरू केली आहे. मात्र, बससेवेला संपातील कर्मचाऱ्यांनी विरोध केल्याने बस आगारात गोंधळ होवून तणाव निर्माण झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात धुळ्यासाठी पहिली बस रवाना करण्यात आली. दरम्यान, धुळ्यातही अशाचप्रकारे बससेवा सुरू केली असता चार बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यात एक चालक जखमी झाला आहे. ( ) वाचा: करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी जवळपास पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे बससेवा थांबलेली आहे. यात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडगा निघत नसल्‍याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे आंदोलन सुरूच आहे. पंधरा दिवसांपासून आजपर्यंत बससेवा बंद होती. मात्र, आज पोलीस बंदोबस्‍तात प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांच्या साह्याने बससेवा सुरू करण्यात आली. आज तब्‍बल १५ दिवसांनंतर दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास (क्र. एमएच २०, बीएल ३९३६) आगारातून बाहेर पडली पण यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. वाचा: विरोधामुळे गोंधळ, तणाव सुरू असताना प्रतीक्षा यादीतील चालक, वाहकांच्या तातडीच्या नियुक्तीला संपकरी कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. बस जावू देणार नाही, असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठिय्या मांडला. कर्मचाऱ्यांसोबत मनसेचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चा केली. ही चर्चा संपल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी विरोध कायम ठेवल्याने गोंधळ निर्माण होऊन तणावाचे वातावरण पसरले. त्यानतंर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना रोखून धरल्यानंतर पहिली बस रवाना झाली. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Fznjsx

No comments:

Post a Comment