Breaking

Sunday, November 21, 2021

पैसा सर्वस्व नाही! कोट्याधीश गुंतवणूकदार अश्विनी गुजराल यांचे भावनिक ट्विट, केलं हे आवाहन https://ift.tt/3xd7rZR

मुंबई : भांडवली बाजारातील नावाजलेले गुंतवणूकदार आणि पोर्टफोलिओ मॅनेजर यांचे एक भावनिक ट्विट सध्या गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेल्या गुजराल यांनी पैसा सर्वस्व नाही, तब्बेतीची हेळसांड करून पैसे कमावण्यात काही अर्थ नाही, असे सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. स्टॉक मार्केट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी गुजराल यांनी भांडवली बाजारातून आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. गुजराल अनेक वृत्तवाहिन्यांवर शेअर गुंतवणुकीबाबत आपली मते मांडतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाला गुंतवणूकदारांमध्ये महत्व आहे. मात्र अश्विनी गुजराल यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक कबुली दिली आहे. गुजराल यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये गुजराल यांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, ''मागील सहा महिन्यांपासून खांद्याच्या दुखण्याने बेजार झालो आहे. राकेश चालू शकत नाही. तब्येतीची हेळसांड करून कमावलेल्या पैशांचा काही फायदा नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याही पलीकडे बाजाराची ही एक स्वतःची दुनिया आहे, असे अश्विनी गुजराल यांनी म्हटलं आहे. गुजराल यांच्या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. तर काहींनी राकेश झुनझुनवालांसोबत असलेल्या मैत्रीबाबत प्रश्न विचारले आहेत. गुजराल यांनी या ट्विटमधून 'पैसा हे सर्वस्व नाही' असे सूचकपणे गुंतवणूकदारांना सांगितले आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात प्रसिद्ध उद्योजक राकेश झुनझुनवाला यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी झुनझुनवाला खुर्चीवर बसले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहून चर्चा करत होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर झुनझुनवाला यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. प्रकृती ठीक नसल्याने झुनझुनवाला पंतप्रधानसमोर बसून बोलत होते, असे तर्क लढवण्यात आले. करोना टाळेबंदीच्या काळात राकेश झुनझुनवाला जवळपास १८ महिने आजारी होते. या काळात त्यांना करोनाची देखील लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली तसेच उपचारांतून त्यांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवले होते. भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची एकूण मालमत्ता ५.५ अब्ज डॉलर ( ३८ हजार कोटी) आहे. फोर्ब्स इंडियानुसार झुनझुनवाला भारतातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत १८ व्या स्थानी आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30NrTnV

No comments:

Post a Comment