Breaking

Sunday, November 28, 2021

Parliament Session : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी वातावरण तापण्याची शक्यता https://ift.tt/3CVGZoU

नवी दिल्ली : सोमवारपासून म्हणजे आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter session of Parliament) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत वातावरण तापण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही (All Party Meeting)तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाने (AAP) बैठकीतून वॉकआउट केलं तर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल टीका केली. यामुळे आजच्या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि वीज बिलावर चर्चा होऊ शकते. यासोबतच विरोधक कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा मुद्दाही उपस्थित करू शकतात. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याचा डाव आखला असल्याची राजकीय चर्चा आहे. इतकंच नाहीतर, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किमतींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सगळ्यात विशेष म्हणजे सरकारने यापूर्वीच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयकही सभागृहात मांडले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. सत्ताधारी पक्ष भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हीप जारी करून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाबाबत संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी म्हटले आहे की, या अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, मात्र चर्चा पूर्णपणे सकारात्मक असावी. त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cVIhpt

No comments:

Post a Comment