Breaking

Friday, December 17, 2021

लॉजवर गेल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील चौघांना अखेर अटक! https://ift.tt/3Eaz2Nc

: हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढल्यानंतर बदनामीची भीती दाखवून व्यापाऱ्याकडून अडीच लाख रुपये उकळणाऱ्या चौघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. सागर पांडुरंग माने (वय ३२), विजय यशवंत मोरे (३६), फारुख बाबासाहेब शेख (३५), विजय उर्फ पिंटू शंकर कलकुटगी (२९) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. () स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता. ही टोळी व्यापारी, उद्योजक आणि इतर सधन मंडळींना हेरत असे. टोळीतील महिला सहकाऱ्याच्या माध्यमातून सावज असलेल्या व्यापारी आणि उद्योजकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधली जायची आणि त्यानंतर संबधित महिला ही व्यापारी अथवा उद्योजकाला भेटायला गेल्यावर तिथे जाऊन ही टोळी व्हिडिओ अथवा फोटो काढून ब्लॅकमेल करत असे. तसंच त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले जात होते. पण बदनामीच्या भीतीने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. लक्ष्मीपुरीतीतील एका व्यापाऱ्याने स्वत:चे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर तक्रार केल्यावर पोलिसांनी या टोळीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चौघांना अटक केली असून गुन्ह्यातील महिला व तिचा भाऊ यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या चौघांना कोर्टाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3p7h5Lo

No comments:

Post a Comment