Breaking

Friday, December 17, 2021

ठाण्यातील सोनसाखळी चोरांना पकडायचं कसं?; पोलिसांनी युक्ती लढवली आणि... https://ift.tt/324Oy09

ठाणे: गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील कळवा स्टेशन परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत चालले होते. याबाबत अनेक तक्रारी देखील पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. या सोनसाखळी चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाण्यातील कळवा पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचून एका २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणात त्याचा आणखी एक साथीदार सहभागी असून तो सध्या फरार आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत. ( kalwa police set a trap and caught the ) ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले होते. काही इसम दुचाकीवरून येऊन आपल्या गळ्यातील चैन किंवा मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याच्या तक्रारी कळवा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी कळवा पोलिसांनी युक्ती लढवत तांत्रिक यंत्रणा आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचला. क्लिक करा आणि वाचा- यादरम्यान पोलिसांच्या हाती एक २० वर्षीय तरुण सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. शंकर राजकुमार प्रताप उर्फ कांबळे असे या आरोपीचे नाव असून तो कळवा येथील शांतीनगर परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाशी आहे. शंकरला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ७ गुन्ह्यांपैकी ३ गुन्ह्यांची उकल त्याच्याकडून केली आहे. तसेच सोनसाखळी चोरी दरम्यान हिसकावून नेलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल हा १ लाख ३८ हजार इतक्या किमतीचा आहे. या प्रकरणात शंकरचा एक साथीदार हिप्पो उर्फ गणेश हा अद्याप फरार आहे. पोलीस हिप्पोचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. क्लिक करा आणि वाचा- हिप्पो हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याआधी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यानंतर इतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच या दोन्ही आरोपींनी अजून किती सोनसाखळी चोरी केल्या आहेत? आणि इतर कुठल्या शहरांमध्ये केल्या आहेत का? याचा तपास सुरु आहे. लवकरच हिप्पोला अटक करून इतर गुन्ह्यांची उकल केली जाईल असे आश्वासन यावेळी कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3q9k45d

No comments:

Post a Comment