: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. (Attack On ) या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाले. हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप हल्लेखोरांविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेनं जिल्ह्यातील राजकीय वादाने टोक गाठल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस या हल्ल्याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3z0KnOQ
No comments:
Post a Comment