मुंबई: बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते (Parag Sabghvi) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. पराग संघवी हे एलुम्ब्रा आणि लोटस फिल्म कंपनीचे सीईओ सुद्धा आहेत. भूतनाथ रिटर्न्स, दी अटॅक आॅफ २६/११ सारख्या सिनेमाची निर्मिती संघवी यांनी केली आहे. (famous filmmaker by mumbai police economic offences wing) पराग संघवी हे एलुम्ब्रा ग्रुपचे सीईओ आहेत आणि कमला ग्रुप ऑफ कंपनीची एलुम्ब्रा कंपनी ही सिस्टर कंपनी आहे. कमला ग्रुप कंपनीने लोकांडून पैसे घेतले आणि ते पैसे एलुम्ब्रा, प्लेबॉय आणि आणखीन एका कंपनीमध्ये ते पैसे वळवले. एकूण ४२ कोटी रुपये कमला ग्रुप ऑफ कंपनीमधून बाकीच्या तीन कंपनीमध्ये ते वळवण्यात आले. प्लेबॉय आणि एलुम्ब्रा कंपनीमध्ये पराग संघवी हे कमला ग्रुप ऑफ कंपनीचे जितेंद्र जैन सुद्धा या कंपनीमध्ये पराग संघवी सोबत डायरेक्टर आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने मध्ये पराग संघवी विरुद्ध एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर काहींचे कोट्यवधीचे फ्लॅटही परस्पर विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. क्लिक करा आणि वाचा- सप्टेंबर महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी पराग संघवींच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. बँक डिफॉल्ट प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पराग संघवींवर ही कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान पराग संघवी यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक तास चौकशी केली. क्लिक करा आणि वाचा- पराग संघवी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी 'सरकार', 'पार्टनर' आणि 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देखील मिळाले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32m13nN
No comments:
Post a Comment