नवी दिल्ली: राज्यसभेत आज पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने वातावरण तापलेलं असतानाच आज पक्षाचे सदस्य यांनाही निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. निवडणूक सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे डेरेक ओब्रायन यांच्यावर सभापतींनी कारवाईचा बगडा उगारला आहे. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईवर डेरेक यांनी तीव्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. ( ) वाचा: केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री यांनी आज राज्यसभेत मांडलं असता त्यावर वादळी चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकावर अनेक आक्षेप नोंदवले. या विधेयकावर बोलताना तृणमूलचे सदस्य डेरेक ओब्रायन आक्रमक झाले. विधेयक संमत करण्याच्या पद्धतीवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला व भाजपला लक्ष्य केलं. मी नियमांचा आदर करतो मात्र ज्या पद्धतीने कृषी विधेयके या सभागृहात मंजूर करून घेण्यात आली, त्याच पद्धतीने हे विधेयक रेटून नेण्यात येत आहे. हे आम्हाला मान्य नाही, असे म्हणत रागाच्या भरात डेरेक यांनी आपल्या हातातील नियम पुस्तिका सभापतींच्या आसनाच्या दिशेने भिरकावली. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि डेरेक यांच्यासह विरोधी बाकांवरील अन्य सदस्यांनी निषेध नोंदवत सभात्याग केला. डेरेक यांच्या या वर्तनावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला. सभागृह नेते यांनीही ही बाब गंभीर असल्याचे नमूद केले. त्यानंतर डेरेक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि मतदानाअंती त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हिवाळी अधिवेशनापुरते हे निलंबन आहे. अधिवेशनाचे सूप उद्या वाजणार आहे. अशावेळी डेरेक यांनी फक्त उद्याचाच दिवस कामकाजापासून दूर राहावं लागणार आहे. वाचा: दरम्यान, डेरेक यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गेल्यावेळी कृषी विधेयक राज्यसभेत मांडले गेले तेव्हा मला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता निवडणूक सुधारणा विधेयकावेळी माझ्यावर कारवाई केली गेली आहे. भाजपने संसदेची जी थट्टा चालवली आहे त्यावर आक्षेप घेतला म्हणून माझ्यावर ही कारवाई केली गेली आहे. त्यामुळे कृषी विधेयकांप्रमाणे आजचे विधेयकही मागे घेण्याची वेळ सरकारवर येवो, अशीच माझी इच्छा असल्याची तीरकस प्रतिक्रिया डेरेक यांनी दिली. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qjanB0
No comments:
Post a Comment