हिंगोली: देशात मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व सामांन्यासह सर्वांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागले आहेत. अनेकांचे व्यवसाय बुडाले, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, सर्व सामन्याच्या हाताला काम मिळेना, त्यातच आता ओमायक्रोनने एन्ट्री केलीय. त्यामुळे पुन्हा निर्बंध येणार का? याची धास्ती व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना लागली आहे. जुन्या वर्षातील जखमा भरल्या नसताना पुन्हा सरकारने नव वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारीपासून सर्व सामन्याच्या खिशाला कात्री लावण्यासाठी कोणता निर्णय घेतला पाहुयात... नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज आहे. येणारे वर्ष आनंददायी ठरावे, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र नवे वर्ष घेऊन येणार आहे. सरकारने आणि फूटवेअरवरील जीएसटीमध्ये वाढ केली आहे. नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू होणार आहे. त्यामुळे तयार कपडे, जोडे आणि चपलांच्या किमती वाढणार आहेत. सप्टेंबरमध्ये परिषदेची बैठक झाली होती. त्यात काही वस्तूंवरील जीएसटीचा दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जानेवारी २०२२ पासून नवे दर लागू होणार आहेत. त्यानुसार, १ हजार रुपयांहून कमी किमतीच्या कपड्यांवरील जीएसटीचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. जोड्यांवरही हाच दर लागू होणार आहे. याशिवाय शिवलेल्या कपड्यांसह हातमागावर विणलेले कपडेही महाग होणार आहेत. शिलाईसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या धाग्यांवरही जीएसटी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तयार कपड्यांसोबतच आता कपडे शिवणेही महागणार आहे. याचा गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या बजेटवर निश्चितच परिणाम होणार आहे. हळद पिकांवर सुद्धा जीएसटी लागणार असल्याचे म्हटले आहे. हळद हे पिक धान्य पिकांमध्ये मोडत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये सुधा तीव्र नाराजी पसरली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mJaLI9
No comments:
Post a Comment