रत्नागिरी: शिवसेना नेते () आणि परिवहन मंत्री () वादात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. भाजप नेते (Kirit Somaiya) यांना दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणीही नव्हे, तर आपण पुरवली असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत आरटीआय कार्यकर्ते रिझवाना काझी यांनी हा गोप्यस्फोट केला आहे. या सगळ्या प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळविण्याची शक्यता आहे. (kadam parab conflict rti activist rizwana qazi claims that he provided information to about the unauthorized construction of sai resort in dapoli) दापोलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. या सगळ्या बाबत आपण मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी माहीती देणार आहोत असेही काझी यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- प्रसाद कर्वे यांना सोमय्या यांचा मोबाईल क्रमांक आपण दिला त्यामुळे यासंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे ही माहिती आपण सोमय्या यांना दिली मात्र याचा राजकीय फायदा काहींनी उठवला आहे. माझा वाळूचा व्यवसाय आहे व काही पालकमंत्र्यांच्या जवळची लोक आपल्याकडून हत्पा वसूलीची धमकी देतात असाही गंभीर आरोपही यावेळी केल्याने खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात मुरुड समुद्र किनारी असलेल्या साई रिसॉर्ट हे पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा जाहीर आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यानी केला होता. या सगळ्याची माहिती सोमैय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर रिझवान काझी यांच्या दाव्यामुळे या सगळ्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3e6X9SA
No comments:
Post a Comment