Breaking

Thursday, December 23, 2021

लुधियाना स्फोटामागे पाकिस्तानचा हात?; धक्कादायक माहिती आली समोर https://ift.tt/3mu5Bjo

लुधियाना: पंजाबमधील आज बॉम्बस्फोटाने हादरले. या स्फोटात १ जण ठार तर पाच जण जखमी झाले असून हा आत्मघाती हल्ला होता व स्फोटात जी व्यक्ती ठार झाली तो हल्लेखोरच होता, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. या स्फोटामागील करणारे काही धागेदोरे हाती लागले असून पाकिस्तानातील खालिस्तानी गटाने हा स्फोट घडवून आणला असण्याची शक्यता आहे. त्यादिशेने तपास केला जात आहे. दरम्यान, पंजाबमधील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ( ) वाचा: जवळ आली आहे. त्यामुळे आधीच राजकारण तापलेलं असताना काही घटनांमुळे राज्यात संशयाचे वातावरण तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी सुवर्ण मंदिरात एका तरुणाने पावित्र्य भंग करणारी कृती केली आणि त्यानंतर जमावाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी अन्य एका ठिकाणीही अशीच घटना घडली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आज लुधियाना कोर्ट स्फोटाने हादरले. हा आयईडी ब्लास्ट होता आणि वॉशरूमध्ये बॉम्ब प्लान्ट केला जात असतानाच त्याचा स्फोट झाला व हल्लेखोर त्यात ठार झाला, असा पोलिसांचा अंदाज आहे. जी व्यक्ती ठार झाली आहे त्याचा देह छिन्नविछिन्न झाला आहे. याबाबत फॉरेन्सिक तपासातून अधिक बाबी समोर येतील, असे पोलिसांनी सांगितले. वाचा: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी या स्फोटामागे मोठे कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. राज्यात निवडणुका जवळ येत असताना काही देशविघातक प्रवृत्ती सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून शांतता भंग करणारी कृत्ये केली जात आहेत. मात्र, सरकार त्यांचा हा डाव हाणून पाडेल, असे नमूद करताना नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन चन्नी यांनी केले. मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्फोटातील जखमी तीन रुग्णालयांत दाखल आहेत. तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली. या सर्वांवरील उपचारांचा खर्च सरकार उचलणार आहे, असे चन्नी यांनी नमूद केले. दरम्यान, लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एनएसजी आणि एनआयएचे पथक पंजाबला रवाना करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा स्वतंत्रपणे तपास करणार आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3em4E8c

No comments:

Post a Comment