पुणे : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे चालला आहे, तर राज्यात महाविकास आघाडी सरकार फक्त वसुली करण्याच्या मागे लागलं आहे,' असं म्हणत नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पुणे शहरात शुक्रवारी भाजपच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. () भाजपच्या पुणे शहर कार्यालय उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. 'पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार' 'येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्या शिवाय राहणार नाही. आता मला भाजपाचा भगवा असे स्पेसिफिक पद्धतीने सांगावं लागत आहे. कारण भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांच्या संगतीत आहे, ज्यांना भगव्याचा मानही नाही आणि सन्मानही नाही. ते लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत,' अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून भाजपने येणाऱ्या २५ वर्षांसाठी विकास कामे केली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जर भाजपची सत्ता पुन्हा आली तर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर हे पुणे शहर असेल, असंही फडणवीस म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31w7vs5
No comments:
Post a Comment