Breaking

Friday, December 3, 2021

शिवसेना- भाजप नगरसेवकांमध्ये राडा; महापालिका सभागृहातच भिडले https://ift.tt/3xT2u99

मुंबई: नायर रुग्णालयात उपचाराअभावी चार महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. याचे पडसाद आज शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेत उमटत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बालकाच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून सभागृहात स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्या एका वक्तव्यामुळे ठिणगी पडली आणि भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने उभे ठाकले. (clash between shiv sena and bjp corporators in house in ) या मुद्द्यावर बोलताना भाजपचे लोक राजीनामा देतात आणि शिवसेनेचे लोक मात्र लढतात असे वक्तव्य स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले. जाधव यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे नगरसेवक चिडले आणि त्यांनी यशवंत जाधव यांना घेरले. यावेळी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि स्थायी समितीचे सभापती यशवंच जाधव यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी करण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- नायर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा आपण निषेध करत असून या घटनेसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. मात्र असे असताना भाजपचे लोक मात्र यामध्ये राजकारण करतात. हे लोक राजीनामा देतात आणि आम्ही मात्र लढतो, असे वक्तव्य जाधव यांनी केले. यावरून भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. राजीनामा देताना ज्या भाषेचा त्यांनी वापर केला आहे, ज्या प्रकारे आमच्या पक्षनेतृत्वाचा उल्लेख केला तो निषेधार्ह असल्याचे यशंवत यांनी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे. या वरून सभागृहात समोरा-समोर आलेले भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक सभागृहाबाहेरही आमने-सामने आले. सभागृहाबाहेर एकच गोंधळ माजला. यावेळी भाजप नेता बोलत असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी धक्काबु्क्की केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. क्लिक करा आणि वाचा- मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत असलेल्या बीडीडी चाळीतील एका खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात आगीचा भडका उडाल्याने चार महिन्याच्या बाळासह पाच चौघे जखमी झाले होते.या चौघांना रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31vGBQP

No comments:

Post a Comment