हिंगोली : जिल्हृयातील लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी गुरूवारी बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाचे कान टोचले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. २० डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान सेनगाव तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवक, सरपंच, मुख्याध्यापक, तलाठी, , रास्तभाव दुकानदार, पोलीस पाटील यांचे पथक प्रत्येक गावासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र सहा महिन्यापूर्वी कोरोनामुळे निधन झालेल्या पिंपरी येथील डी.डी. झिंगरे या ग्रामसेवकाला तहसीलदारांनी कामावर हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून प्रशासनाचे डोके ठिकाणवर आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काळात राज्यभरात उत्कृष्ट काम करणारे जिल्हा प्रशासन लसीकरणात मात्र मेटाकुटीस आले आहे. त्यामुळे जिल्हृयातील अनेक गावामध्ये ७५ टक्केच्यावरही लसीकरण झालेले नाही. त्यातच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी १६ डिसेंबर रोजी लसीकरणाचा आढावा घेवून जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पुन्हा जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या. त्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील ७५ टक्के पेक्षा कमी लसीकरण झालेल्या ४९ गावामध्ये २० डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये क्षेत्रिय स्तरावरील सर्व कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वस्त धान्य दुकानदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे. यातील काही ग्रामसेवक यांच्या बदल्या झाल्या आहेत. कोरोनाने मयत झालेल्या ग्रामसेवकाला कामावर येण्याचे आदेश यापुढे जाऊनही सेनगाव तालुक्यताील पिंपरी गावाचे ग्रामसेवक डी.डी. झिंगरे यांचे २२ मे २०२१ रोजी कोरोना साथरोगामुळे कर्तव्यावर असतांना निधन झाले आहे. विशेष म्हणजे झिंगरे यांचे निधन होऊन ७ महिने उलटले तरी तहसीलदारांनी त्यांना पुन्हा कामावर हजर राहण्याचे आदेश काढल्याने नातेवाईकातून संतात व्यक्त होत आहे. यावरून प्रशासन लसीकरण किती गांभीर्याने घेत आहे हेच दिसून येत आहे. तहसीलदारसाहेब, तुम्ही कारवाई कशी करणार आहात? या पथकामार्फत १०० टक्के लसीकरणबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या पथकामध्ये समावेश झालेल्या एखाद्या कर्मचाऱ्याने कामात हजलर्गीपणा केला तर त्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र धरले जाणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ साथरोग प्रतिबंध कायदा, महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही सेनगावचे तहसीलदार जिवनकुमार कांबळे यांनी आदेशात दिली आहे. आता मयत ग्रामसेवक डी.डी. झिंगरे यांच्यावर जिवनकुमार कांबळे कशी कारवाई करतील हा चर्चेचा विषय बनला आहे. एकंदरीतच प्रशासनात ताळमेळ नसल्याचे या प्रकणामुळे पुढे आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3J16HN1
No comments:
Post a Comment