मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या मुलुंडमधील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलासह तीन जणांवर नवघर पोलिसांनी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. या तिघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून मनोज जाधव असे या आरोपीचे नाव आहे. (ransom and filed against son pf from mulund in mumbai) नगरसेविका केणी यांच्या विभागातील एक काम ऑनलाइन टेंडरमध्ये एका कंत्राटदाराला मिळाले होते. मात्र हे टेंडर मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमिक केणी याने त्या कंत्राटदाराला कार्यालयात बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले, असा नमिक केणी याच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या सहकार्याने कंत्राटदाराला बळजबरीने महापालिकेच्या टी विभागात नेण्यात आले. तेथेच कंत्राटदाराला टेंडर मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दिवशी नमित यांच्या हळदीचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी लग्न समारंभ, तर तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांना भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र त्यावेळी पोलिसांनी निमितला अटक केली नाही. आता मात्र पोलिस निमितचा शोध घेत आहेत. क्लिक करा आणि वाचा- नगरसेविका रजनी केणी आणि मुलगा निमित यांचा संपर्क होत नसून कंत्राटदारही प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे. यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3p4aAZr
No comments:
Post a Comment