Breaking

Tuesday, December 21, 2021

'आमदार योगेश कदम यांनी विरोधकांना मदत केली'; सूर्यकांत दळवी यांचा खळबळजनक आरोप https://ift.tt/3phaJJp

रत्नागिरी: दापोली नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान (MLA Yogesh Kadam) यांनी शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले असून त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा खळबळजनक दावा (Suryakant Dalvi) यांनी २१ डिसेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषि गुजर, राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर,संदीप राजपुरे आदी उपस्थित होते. ( former mla has accused of helping the opposition) अपक्ष उमेदवारांच्या बुथवर जाऊन त्यांना आमदार योगेश कदम यांनी पाठबळ दिल्याचा आरोप दळवी यांनी केला आहे. या सगळ्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार योगेश कदम यांनी पक्षादेश मानून प्रवाहात सामील व्हावे असे देखील आवाहन आपण त्यांना करत असल्याचे दळवी यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- या निवडणुकीत महाआघाडीच्या सगळ्या जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दळवी यांच्या गळ्यात केवळ राष्ट्रवादीचा पट्टा असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्याबाबत विचारले असता यावर बोलताना ते म्हणाले की, आमच्या ह्रदयात शिवसेना आहे. ४० वर्षे आपण पक्षाबरोबर आहोत. सात वर्षे अन्याय सहन करुनही आपण शिवसेनेबरोबर प्रामाणिक असल्याचे दळवी यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- नगराध्यक्ष कोणाचा हा निर्णय शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचे नेते घेतील तो आम्ही मान्य करू असेही दळवी यांनी सांगितले. भविष्यात हे वाद थांबतील का असे विचारता दळवी यांनी रामदास कदम यांचे नाव न घेता सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची दिशा काय असेल हे आता आम्हाला समजले आहे, असा टोला दळवी यांनी लगावला आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येत्या काळात शिवसेना राष्ट्रवादी आघाडी व आमदार योगेश कदम यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे आहेत. या सगळ्यात आरोपांवर आता शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3J9f6Oj

No comments:

Post a Comment