Breaking

Wednesday, December 22, 2021

आभासी चलने तेजीत ; बिटकॉइनसह सर्वच प्रमुख क्रिप्टो करन्सीज महागल्या https://ift.tt/3pi89mo

मुंबई : क्रिप्टो करन्सीच्या बाजारात आज तेजी दिसून आली. मागील काही सत्रात झालेल्या घसरणीचा फायदा उचलत आज गुंतवणूकदारांनी आभासी चलनाची जोरात खरेदी केली. ज्यामुळे बिटकॉइनचा भाव ५० हजार डॉलर नजीक पोहोचला. त्याशिवाय इथेरियम, एक्सआरपीसारख्या चलनांमध्येदेखील वाढ झाली. जगातिक क्रिप्टोचे बाजार भांडवल २.३० लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढले आहे. त्यात आज जवळपास ५ टक्के वाढ झाली. तर एकूण क्रिप्टो बाजाराची उलाढाल १० टक्क्यांनी कमी झाली असून ती ८५.०४ अब्ज डॉलर इतकी खाली घसरली. कॉइनमार्केटकॅपनुसार बिटकॉइनचा सध्याचा भाव ४९०४२.३७ डॉलर आहे. त्यात मागील २४ तासात ०.९२ टक्क्यांची वाढ झाली. दुसरे लोकप्रिय आभासी चलन असलेल्या इथेरियमच्या किमतीत देखील ०.७५ टक्के वाढ झाली आहे. एक इथेरियम कॉइनचा भाव ४०१८.२२ डॉलर आहे. तर मागील ७ दिवसांत इथेरियमचा भाव ७.२४ टक्क्यांनी वधारला आहे. बिनान्स कॉईनच्या किमतीत २.९९ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव ५४३.४९ डॉलर आहे. तिथेर १ डॉलरवर स्थिर आहे. सोलानाच्या किंमतीत मागील २४ तासात ३.२० टक्के वाढ झाली. सोलानाचा भाव १८३.८० डाॅलर इतका वाढला आहे. कार्डानोमध्ये ५.४४ टक्के वाढ झाली असून एका कार्डानोचा भाव १.३३ टक्के आहे. एक्सआरपीचा भाव ०.९५ डाॅलर इतका असून त्यात ५.७५ टक्के वाढ झाली. गेल्या आठवड्यापासून तेजीत असलेल्या डोजेकाॅइनचा भाव ०.१८ डाॅलर आहे. पोलकाडाॅटचा भाव २७.५४ डॉलरवर स्थिर आहे. लिटेकाॅइनच्या किंमतीत २.९३ टक्के वाढ झाली आहे. लिटेकाॅइनचा भाव १५८.५४ डाॅलर आहे. एव्हलान्चे काॅइनचा भाव १२३.३७ डाॅलर असून त्यात ५.२२ टक्के वाढ झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3J7zJuB

No comments:

Post a Comment