बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, त्यांना दुर्घायुष्य लाभावं म्हणून पायी तिरुपती वारी करताना कट्टर शिवसैनिक असलेल्या यांच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला, अवघी पोरकी झाली. परंतु सेनाघरातला कर्ता सैनिक गेल्यानंतर त्याचं कुटुंब उघडल्यावर पडू नये म्हणून शिवसेनेने सगळी जबाबदारी उचलली आहे. त्यानुसार सेनेचे औरंगाबादचे माजी खासदार यांच्याकडून ५ लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. बीड येथील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं काल निधन झालं. अवघं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतलेले सुमंत अखेरचा क्षणही आपल्या पक्षप्रमुखासाठी जगले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भगव्या झेंड्यांची, शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची सेवा केली. आपल्या नेत्याला दुर्घाष्य लाभावं म्हणून पायी बीड ते तिरुपती पदयात्रा चालू असताना वाटेतच त्यांना देवाचं बोलावणं आलं. घरातील कर्त्या सुमंत यांच्या जाण्याने रुईकर कुटुंब उघड्यावर पडलं. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधारच गेला. अवघं आयुष्य भगव्यासाठी दिलेल्या सुमंत यांच्या जाण्यानंतर उद्धवजींनी आम्हाला मदत करावी, अशी इच्छा काल सुमंत यांच्या पत्नीने बोलून दाखवली. त्यानंतर लगोलग चंद्रकांत खैरे औरंगाबादवरुन बीडला पोहोचले. रुईकर कुटुंबाला त्यांनी तातडीची ५ लाख रुपयांची मदत केली. चंद्रकांत खैरे यांनी बीड येथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. आपला कर्ता माणूस जरी गेला असेल तरी तुम्ही एकटे नाहीयत, तुमच्यासोबत उद्धवजी आहेत, संपूर्ण शिवसेनेचं कुटुंब आहे, असं चंद्रकांत खैरेंनी यावेळी रुईकर कुटुंबाला सांगितलं. रुईकर यांच्या पत्नीला नोकरी, मुलांचं उच्चशिक्षणाचा खर्च शिवसेनेने उचलला आहे, असं भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं. सुमंत यांच्या निधनानंतर तसंच त्यांच्या पत्नीच्या मदतीच्या आवाहनानंतर शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनीही तातडीची मदत म्हणून ५० रुपये पाठवले आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत असल्याची माहिती देत रुईकर कुटुंबियांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही, असं सांगितलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32GkeZO
No comments:
Post a Comment