Breaking

Thursday, December 2, 2021

अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीने खळबळ; 'या' राज्यातून कॉल https://ift.tt/3rq8FQK

अयोध्या: उत्तर प्रदेशातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या अयोध्येत एका धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. अयोध्येत येणारे सर्व रस्ते, धर्मशाळा, प्रमुख मंदिरे आणि हॉटेल या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. अयोध्यानगरीसह संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ( ) वाचा: जिल्हा पोलिसांकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने ईमर्जन्सी नंबर ११२ वर फोन केला आणि अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची आणि उडवून देण्याची धमकी दिली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा फोन करणाऱ्याला हुडकण्यात आले असून हा तरुण गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे व त्याची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. वाचा: अयोध्या हा अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. त्यामुळेच बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आल्यानंतर सतर्क झाले आहेत. अयोध्येत लगेचच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अयोध्येकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर कसून तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड, हॉटेल्स, धर्मशाळा याठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अयोध्यानगरीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचवेळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अद्याप अयोध्यानगरी तसेच जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, असेही सांगण्यात आले आहे. - अयोध्येतील येथे ब्लॅक कॅट कमांडोजना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. - स्थानिक पोलीस आणि सीएपीएफच्या जवानांनी शहरातील यलो झोनमध्ये रूटमार्च केला. - अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेचे नियंत्रण वरिष्ठ पोलीस अधीक्षकाकडे सोपवण्यात आले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31p6npS

No comments:

Post a Comment