Breaking

Saturday, December 25, 2021

'या' वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन देता येणार; जाणून घ्या तपशील... https://ift.tt/3yWrBbo

नवी दिल्ली: वाढत असल्याने मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. यांनी देशातील १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसचा आपत्कालीन वापर करण्यास आज मंजुरी दिली आहे. त्यामुळे खूप मोठी कोंडी फुटली आहे. ( ) वाचा: भारतात करोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसताना ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट उभे ठाकले आहे. ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत सातत्यान वाढ होत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याचीही दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश आधीच केंद्र सरकारने राज्यांना दिलेले आहेत. अशावेळी लहान मुलांबाबत मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला होता. लहान मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने चिंता वाढली होती. हे टेन्शन काही प्रमाणात आज हलकं झालं आहे. वाचा: कोव्हॅक्सीन लसचा लहान मुलांसाठी आपत्कालीन स्थितीत वापर करण्यास परवानगी मिळावी म्हणून कंपनीने भारताचे औषध महानियंत्रक यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावर आज निर्णय झाला असून ही परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार आता १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन स्थितीत कोव्हॅक्सीनचा वापर करता येणार आहे. वाचा: दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांनी लहान मुलांच्या लसीकरणाची शिफारस आधीच केली आहे. त्यामुळे आता लसच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळाल्याने मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ती खूप मोठा दिलासा देणारी बाब ठरली आहे. सध्या शाळा व कॉलेज सुरू करण्यात आले आहेत. अशावेळी मुलांना संसर्गाचा धोका अधिक असून आता लस उपलब्ध झाल्याने पालकांची चिंताही काहीशी कमी झाली आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eo9JwJ

No comments:

Post a Comment