हर्षदा सोनोने, अकोला : देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. दररोज या ना त्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव अशा बातम्या येत आहे. आज अकोल्यात ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. गेल्या आठवड्यात दुबईवरुन एक महिला अकोल्यात आली होती तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलाय. दुबईवरून 18 डिसेंबरला एक महिला जिल्ह्यात दाखल झाली होती. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचे नमुने हे पुण्याला पाठवल्या नंतर आज पुण्यावरून तिचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सद्यस्थितीत या महिलेची प्रकृती उत्तम असून महिला गृह विलगीकरणात आहे. जिल्ह्यात सध्या सहा रुग्ण अॅक्टिव्ह जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 57909 (43297+14435+177) आहे. त्यात 1142 मृत झाले आहे... तर आतापर्यंत 56761 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे जिल्ह्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू दरम्यान, आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण 60 वर्षीय पुरुष असून अकोट तालुक्यातल्या रोहणा येथील रहिवासी आहे. 18 डिसेंबर रोजी रुग्णाला रुग्णालयात दाखल केले होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. यात काल दिवसभरात 192 चाचण्या घेण्यात आल्या. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून काल दिवसभरात अकोट येथे 10, अकोला महानगरपालिका येथे 130, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 29, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FuID35
No comments:
Post a Comment