मुंबई: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी एसटी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केल्यानंतरही मुंबईच्या आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुढेही सुरूच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुजर यांचा निर्णय अमान्य करत 'दुखवटा' सुरूच ठेवला आहे. आता अॅड. यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमचा हा संप नव्हता. आमचा कष्टकऱ्यांचा दुखवटा आहे. यापूर्वी २८ संघटनांनी आधीच माघार घेतली आहे. ही २९ वी संघटना आहे. त्या संघटनेला आणि अजय गुजर यांना आम्ही टाळ्या वाजवून मुक्त करत आहोत, असे सदावर्ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील आझाद मैदानासह राज्यभरात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Srike) सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी ठाण मांडून आहेत. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाचा मुद्दा त्यांनी लावून धरत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी एसटी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एसटी कर्मचारी संपात उभी फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, अजय गुजर यांचा निर्णय अमान्य करत, आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार केला आहे. आमचा सदावर्तेंना पाठिंबा आहे, विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अॅड. सदावर्ते यांनी आता आमचा लढा यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया दिली. आमचा संप कधीच नव्हता. आमच्या कष्टकऱ्यांचा हा दुखवटा आहे. यापूर्वी २८ संघटनांनी माघार घेतलेली आहे. ही २९ वी संघटना आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. त्या संघटनेला आणि अजय गुजर यांना आम्ही टाळ्या वाजवून येथून मुक्त करत आहोत, असे सदावर्ते म्हणाले. संपाच्या पुढच्या दिशेबाबत सदावर्ते म्हणाले की, 'त्यांच्या नोटिशीवर हा दुखवटा मोडला जाऊ शकत नाही. ही एक वेगळ्या आशयाची, प्रेरणा देणारी दुखवट्याची चळवळ आहे. ९२ हजार कष्टकरी एकत्र आहेत.' यांच्यावर आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले. शरद पवार यांचे काही लोक गुजर यांच्यावर दबाव टाकत होते. ते गुजर यांच्यावर दबाव टाकू शकतात. ते त्यांच्या दबावाला बळी पडले असतील. पण मी त्यांच्या दबावाला बळी पडू शकत नाही. याआधीच्या बऱ्याच संघटना कष्टकऱ्यांपासून त्यांनी दूर केल्या. आता पहिल्यांदाच कष्टकरी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलाय, ही त्यांच्यातील अस्वस्थता आहे, असे सदावर्ते म्हणाले. मोठ्या मोठ्या आंदोलनात अशा छोट्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे या गोष्टीला फार महत्व दिले जाऊ नये, असेही ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mo82nl
No comments:
Post a Comment