ठाणे: येथील परिसरात एका घराला सोमवारी रात्री आग लागली. तळ अधिक दोन मजली घर आहे. या घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दोघा वृद्ध व्यक्तींना जवानांनी सुखरूप बाहेर काढले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तळ अधिक दोन मजली घराला सोमवारी रात्री अचानक आग लागली. ठाणे शहरातील नौपाडा परिसरात ही घटना घडली. आगीची माहिती समजल्यानंतर नौपाडा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी टीडीआरएफ जवानांनी या ठिकाणी राहणाऱ्या रवी टकले (वय ८४) आणि कुंदा टकले (वय ७८) या दोघांना सुखरुपणे घरातून बाहेर काढले. या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, नेमकी ही आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. तळमजल्यावर ही आग लागल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3q6bAvC
No comments:
Post a Comment