अकोला : अकोला शहरातील हळदी कुंकवासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची 65 ग्रॅम मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता सातव चौकामधील हेडगेवार रक्तपेढी जवळ घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या संगीता सोनटक्के या इतर महिला नातेवाईंकासोबत ऑटोमध्ये हेडगेवार रक्तपेढी येथील एका अपार्टमेंटमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे हळदी कुंकवासाठी गेल्या होत्या. हळदी कुंकू आटोपल्यावर ऑटोकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी चालकाने त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्यासमोर गाडी उभी केली. नंतर दुचाकीवरील एक युवक हा खाली उतरून त्यांच्या दिशेने आला. त्याने संगीता सोनटक्के यांच्या गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र ओढून नेलं. ओढलेल मंगळसूत्र खाली पडलं. ते मंगळसूत्र त्याने उचलून परत गाडीवर बसून पोबारा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी तसेच शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील विशेष पथकाचे कर्मचारी हे घटनास्थळी रवाना झाले. अज्ञात दुचाकीचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक येणाऱ्या- जाणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DIRov7z0
No comments:
Post a Comment