Breaking

Monday, January 31, 2022

भारतीय हद्दीत पाकच्या ३ बोटींची घुसखोरी; BSFची मोठी कारवाई https://ift.tt/E9MUcoOtI

अहमदाबाद: गुजरातमध्ये भारतीय हद्दीत पुन्हा एकदा पाकिस्ताने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय सागरी हद्दीत घुसलेल्या तीन पाकिस्तानी मच्छिमार बोटी सीमा सुरक्षा दलाने ( ) जप्त केल्या असून एका पाकिस्तानी मच्छिमाराला अटक करण्यात आली आहे. ( ) वाचा : सीमेवर पाकच्या सतत कुरापती सुरू असतात. समुद्रातही अनेकदा पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रकार घडलेले आहेत. त्यात आता एकाचवेळी तीन मच्छिमार बोटी भारतीय हद्दीत घुसल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. आज बीएसएफने कच्छ भागात मोठी कारवाई केली असून त्याबाबत बीएसएफच्या गुजरात फ्रंटियरकडून माहिती देण्यात आली आहे. कच्छमधील भागातून पाकिस्तानच्या तीन मच्छिमार बोटी ताब्यात घेण्यात आल्या असून एक पाकिस्तानी नागरिक सीमा सुरक्षा दलाच्या हाती लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात दलदल असून त्याचा फायदा घेत इतर मच्छिमार पाकच्या हद्दीत पसार झाले, असे बीएसएफ गुजरात फ्रंटियरच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. सर खाडी पाकिस्तान हद्दीला लागून आहे व सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदशील भाग मानला जातो. त्यामुळेच या भागात सीमा सुरक्षा दलाची २४ तास गस्त असते. या गस्ती पथकानेच ही कारवाई केली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. वाचा : दरम्यान, पाकिस्तानच्या मच्छिमार बोटांवर याआधीही अनेकदा कारवाया झालेल्या आहेत. अलीकडेच बोटीतून ४०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज गुजरातमध्ये आणल्याचेही उघड झाले होते. त्या बोटीत कराचीतील ड्रग माफिया हाजी हसनचा मुलगा साजिद होता, अशी माहितीही पुढे आली होती. ९ जानेवारी रोजी गुजरातच्या समुद्रात एक यासीन नावाची पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली होती. त्या बोटवरील १० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्याआधी गेल्या १५ सप्टेंबरलाही गुजरातमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा १२ जणांना अटक करण्यात आली होती. यामागे ड्रग्ज तस्करी व दहशतवादी कारवायांचे कारस्थान असण्याची शक्यता लक्षात घेत सुरक्षा यंत्रणांना अधिक अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lQcxhsgEt

No comments:

Post a Comment