Breaking

Saturday, January 8, 2022

सेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर, अनिल परब यांना धक्का, पत्र लिहित.... https://ift.tt/33kGUza

हिंगोली : एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी गेल्या दोन महिन्यापासून काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार, असा निर्धारच एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणात कळमनुरीचे शिवसेना आमदार यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिवहन महामंडळचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, अशी मागणी केली आहे. आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कामगार हे तुटपुंजा वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आता वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटाला कंटाळून एसटी महामंडळाच्या ६३ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करावे, असे या पत्रात म्हटले आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब जसा एसटी कर्मचारी संप सुरु झाला आहे, तसं महामंडळाचं विलिनीकरण शासनात करता येणार नाही, ती सध्या तरी अशक्य गोष्ट आहे. समितीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत आहेत. एकंदरितच त्यांचा सूर विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. दुसरीकडे खुद्द सेना आमदारानेच कामगारांची बाजू घेऊन सरकारविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित विलिनीकरणाची मागणी केली केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3f1MgSr

No comments:

Post a Comment