Breaking

Saturday, January 8, 2022

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी 'या' ४ नावांची चर्चा! https://ift.tt/3taASfk

: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी आघाडीने विजय मिळवल्याने आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्याला वेळ देता येत नसल्याचं सांगत मंत्री यांनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आमदार पी.एन. पाटील आणि प्रताप माने यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. () जिल्हा बँकेत १८ जागा मिळवत सत्ताधारी आघाडीने पूर्णपणे वर्चस्व मिळवलं आहे. शिवसेनेला तीन जागा मिळाल्याने किंगमेकरची भूमिका बजावण्यात अडथळा आला आहे. सत्ताधारी आघाडीत राष्ट्रवादीचे आठ तर काँग्रेसचे पाच संचालक आहेत. जनसुराज्य व भाजपला एकेक जागा मिळाली आहे. यामुळे आणि काँग्रेसचे नेते जे ठरवतील त्याच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. या पदासाठी सध्या तरी मंत्री मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील यांच्यासह विनय कोरे व प्रताप माने यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, कोरे यांच्या दोन जागा पराभूत झाल्याने त्यांनी सत्ताधारी आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी अध्यक्षपद, उपाध्यक्षपद अथवा स्वीकृत संचालकपद यापैकी एक तरी पद द्यावे लागणार आहे. विनय कोरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू असा शब्द मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे. लवकरच सर्व नूतन संचालकांची बैठक घेऊन अध्यक्षपद कुणाला द्यायचे याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेची निवडणूक ही नुरा कुस्ती नव्हती असा खुलासाही त्यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3f75LJj

No comments:

Post a Comment