Breaking

Monday, January 17, 2022

बोंबला, मतदानापूर्वीच काँग्रेस जिल्हाध्यक्ष भाजपला जाऊन मिळाला?; आरोप करणाराही काँग्रेस नेताच https://ift.tt/33s5X3x

औरंगाबाद : मराठवाड्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे आणि देवगिरी महानंद या नावाने बाजारपेठेत स्थान मिळवलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाची २२ जानेवारीला निवडणूक पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच औरंगाबादमध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळाला असून, या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच स्वतः भाजपला मदत करत असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केला आहे. औताडे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केला आहे की, औरंगाबाद जिल्हा दूध संघाची निवडणूक सुरु आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे स्वतः भाजपला मदत करत असून, भाजपचे नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे यांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप औताडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढे बोलताना औताडे म्हणाले की, "मला काँग्रेस कार्यकर्त्यांचे फोन येत आहे की, जर जिल्हाध्यक्षच भाजपसोबत गेले असतील तर आम्ही आपल्या उमेदवारांचा प्रचार कसा करावा. त्यामुळे याचा जिल्हाध्यक्ष काळे यांनी खुलासा करावा, अशी मागणी औताडे यांनी केली आहे. तसेच मार्केट कमिटीचे चौकशी सुरू असल्यानेच काळे भाजपसोबत गेल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे या सर्व घटनेची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देणार असल्याचं सुद्धा औताडे म्हणाले. असा आहे निवडणूक कार्यक्रम.... अर्जांची छाननी : २७ डिसेंबर झाली अर्ज माघार घेण्याची मुदत : ११ जानेवारीपर्यंत चिन्हांचे वाटप : १२ जानेवारी रोजी मतदान : २२ जानेवारी मतमोजणी : २३ जानेवारी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3I7T512

No comments:

Post a Comment