Breaking

Friday, January 28, 2022

पैशांच्या मागे न धावणाऱ्या खेळाडूला अखेर मिळाले फळ, भारतीय संघात केली धडाकेबाज एंट्री... https://ift.tt/34ghZ06

मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाच्या क्रिकेटबद्दल असलेल्या प्रेमाची तुलना 'कँडी स्टोअर'मध्ये उभ्या राहणाऱ्या लहान मुलाशी केली आहे. त्याला फक्त क्रिकेटच्या मैदानावर खेळाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, असे भारताचा माजी अष्टपैलू म्हणाला. २०२१ हे वर्ष हुड्डा यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्यासोबत भांडण झाल्यानंतर त्याने बडोदा संघ सोडला, पण त्याला खेळण्याची संधी मिळालेल्या प्रत्येक स्पर्धेत त्याने प्रभावी कामगिरी केली आणि आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी पहिल्यांदाच त्याचा भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या दीपक हुड्डाची २०१७ मध्ये भारताच्या टी-२० संघात निवड झाली होती, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. हुड्डासाठी गेले १२ महिने खडतर होते, पण त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यावर मात करण्यासाठी जबरदस्त मानसिक ताकद दाखवली आहे. क्रुणाल पंड्याशी झालेल्या वादानंतर बडोदा संघाच्या हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर सहा महिन्यांनी तो २०२१-२२ हंगामापूर्वी राजस्थानमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून सामील झाला. लहान संघांमध्ये सामील होणाऱ्या बाहेरील खेळाडूंना मॅच फी व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे दिले जातात, पण हुड्डासाठी पैसे महत्त्वाचे नव्हते. म्हणून तो राजस्थान असोसिएशनच्या (RCA) अधिकाऱ्यांशी याबाबत कधीही बोलला नाही. त्याला फक्त खेळाच्या मैदानात परतायचे होते आणि राजस्थानलाही त्याच्यासारख्या चांगल्या खेळाडूची गरज होती. आरसीएचे सचिव महेंद्र शर्मा म्हणाले की, “त्याला फक्त खेळायचे होते. व्यावसायिक खेळाडूंप्रमाणे तो कधीही पैशांबद्दल बोलला नाही. तो कोणत्या परिस्थितीतून गेला, हे आम्हाला माहीत होतं. दोन्ही पक्षांसाठी हा फायद्याचा करार होता. आम्हाला त्याच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूची गरज होती, जो स्थानिक खेळाडूंनाही मार्गदर्शन करू शकेल.'' शर्मा पुढे म्हणाले की, "त्याने आमच्या संघातून खेळताना चांगली कामगिरी केली, ज्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली, याचा आम्हाला आनंद आहे." हुड्डा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. राजस्थानसाठी ही त्याची पहिलीच स्पर्धा होती, त्यानंतर त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्णधार बनवण्यात आले होते, जिथे त्याने कर्नाटकविरुद्ध शतक झळकावले. हुड्डाचा मार्गदर्शक असलेला इरफान पठाण म्हणाला की, ''ही खरी गोष्ट आहे. अनेक संघांना तो हवा होता. त्याला पैशाची पर्वा नव्हती. त्याला फक्त मैदानावर खेळायचे होते. जेव्हा क्रिकेट खेळण्याचा विचार येतो, तेव्हा तो मिठाईच्या दुकानात उभ्या असलेल्या मुलासारखा दिसतो. त्याला क्रिकेट खूप आवडते. त्याला इतर फायद्यांची पर्वा नाही. तो पैशांबाबतही बोलत नसल्याने आरसीएच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. तो व्यावसायिक विषयांवर बोलत नाही.''


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rbith6

No comments:

Post a Comment