Breaking

Thursday, January 27, 2022

करोनाबाबत धक्कादायक माहिती आली समोर; 'ज्यांनी लस घेतली नाही तेच...' https://ift.tt/35k9eT2

नवी दिल्ली: कोविडपासून बचाव करायचा असेल तर अत्यंत महत्त्वाचे असल्याचे केंद्र सरकारने आज पुन्हा एकदा ठाम शब्दांत सांगितले. लस घेतली नसेल तर कसा धोका वाढतो, हे सांगण्यासाठी यावेळी दिल्लीतील मृत्यूंबाबतचा तपशील देण्यात आला. ( ) वाचा : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांचे ( NCDC ) संचालक यांनी पत्रकार परिषदेत आज अत्यंत महत्त्वाची माहिती दिली व लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यांनी घेतली नाही आणि ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशा व्यक्ती 'हाय रिस्क' गटात मोडतात. प्रातिनिधिक स्वरूपात नुसती राजधानी दिल्लीतील आजची आकडेवारी पाहिली तर कोविडने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६४ टक्के रुग्ण एकतर लस घेतली नाही असे होते किंवा सहव्याधीग्रस्त होते. ही बाब लक्षात घेता लसीकरणाबाबत टाळाटाळ करू नका, अशी विनंतीच सिंह यांनी केली. वाचा : आयसीएमआरचे महासंचालक यांनीही यावेळी लसीकरणावरच जोर दिला. कोविड विरोधी लढ्यात लसीकरण हे सर्वात प्रमुख आयुध ठरले आहे. त्यामुळे लस घेतली नसेल तर तुम्ही तुमचाच जीव धोक्यात घालत आहात हे स्पष्ट आहे. लस घेतली असेल तर मृत्यूचा धोका खूप कमी होतो हे सिद्ध झाले आहे. ही बाब सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे, असे भार्गव म्हणाले. देशात ९५ टक्के लोकांना लसचा पहिला डोस दिला गेला आहे तर ७४ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. मात्र काही राज्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे, असे आवाहन भार्गव यांनी केले. सध्या मुबलक प्रमाणात लससाठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्याबाबतची अडचण येणार नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले. ज्या व्यक्तींना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्यांनी गर्दीत जाणे टाळावे. करोनाची लागण होणार नाही यासाठी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. वाचा : करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यात मदत झाली, असे यावेळी आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल म्हणाले. दुसरी लाट पीकवर असताना ७ मे २०२१ रोजी ४ लाख १४ हजार १८८ रुग्णांची नोंद झाली होती व एका दिवसात ३ हजार ६७९ रुग्ण दगावले होते. तेव्हा लसीकरणाचे प्रमाण केवळ तीन टक्के इतके होते. आता तिसऱ्या लाटेत २१ जानेवारी २०२२ रोजी ३ लाख ४७ हजार २५४ रुग्णांची नोंद झाली आणि ४३५ रुग्ण दगावले. अर्थात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात यश आले, असे अगरवाल यांनी सांगितले. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3KMTIiN

No comments:

Post a Comment