Breaking

Thursday, January 27, 2022

Nagar Panchayat Election : प्रतिक्षा संपली, आता वेध लागले, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर! https://ift.tt/35w7F4H

हिंगोली - राज्यात बुधवारी पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांनाच प्रतिक्षा होती नगराध्यक्षपदाच्या सोडतीची. राज्यातील १३९ नगरपंचायतींची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे आता या नगरपंचायतीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडत प्रसंगी उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. मराठवाड्यात कोणत्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षासाठी कोणतं आरक्षण? लातूर जिल्हा - जळकोट नगरपंचायत- अनुसूचित जाती महिला शिरूर अनंतपाळ- सर्वसाधारण महिला चाकुर- सर्वसाधारण जनरल देवणी- अ. नु. जाती जनरल रेणापूर- सर्वसाधारण महिला नांदेड जिल्हा - हिमायत्नगर- सर्वसाधारण. नायगाव- सर्वसाधारण महिला. माहूर- सर्वसाधारण जनरल. अर्धापूर - हिंगोली जिल्हा - औंढा नागनाथ- अनुसूचित जाती जनरल सेनगाव- सर्वसाधारण महिला. बीड जिल्हा - पाटोदा- सर्वसाधारण महिला. आष्टी- सर्वसाधारण महिला. शिरूरकासार - सर्वसाधारण महिला वडवणी- सर्व केज- अनुसूचित जाती जनरल औरंगाबाद जिल्हा- सोयगाव- अनुसूचित जमाती फुलंब्री- सर्वसाधारण महिला जालना जिल्हा - तीर्थपुरी सर्वसाधारण महिला घनसावंगी- सर्वसाधारण जाफराबाद- सर्वसाधारण महिला बदनापूर- सर्वसाधारण महिला मंठा- सर्वसाधारण महिला जिल्हा परभणी- पालम- सर्वसाधारण महिला. जिल्हा उस्मानाबाद वाशी- अनुसूचित जाती जनरल लोहरा बु.- सर्वसाधारण


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32BHQiq

No comments:

Post a Comment