Breaking

Tuesday, January 18, 2022

न्यायाधीशांचे कपडे वारंवार चोरीला; अखेर घराबाहेर सापळा रचला आणि.... https://ift.tt/3Aa3XJb

: धुतलेले कपडे कोणी तरी सतत चोरुन नेत असल्याने वैतागले होते. अखेर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. सोमवारी पहाटे चोरटा आला आणि दोरीवर वाळत घातलेले कपडे घेऊन पळून जात असताना न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घालून पकडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. सदर आरोपीला कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. () कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या गारगोटी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय आहे. न्यायालयाच्या आवारातील न्यायाधीशांच्या निवासस्थानात ते कुटुंबासह राहतात. निवासस्थानाच्या बाहेर धुवून वाळत घातलेले कपडे कोणी तरी चोरुन नेत होते. कपडे चोरीच्या वारंवार घटना घडू लागल्याने न्यायाधीश वैतागले. त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी निवासस्थानाच्या आसपास पहारा सुरू केला. सोमवारी पहाटे न्यायालयाकडील बाजूने एक व्यक्ती निवासस्थानाच्या परिसरात आली. त्याने थेट न्यायाधीशांच्या घराबाहेर दोरीवरील वाळलेले कपडे घेऊन पळ काढला. कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करुन कपड्यासह पकडले आणि भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, सुशांत चव्हाण असं चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली. त्याला कोर्टापुढे हजर केले असता चोरट्याला तीन दिवसाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FFA7xd

No comments:

Post a Comment